श्रीरामरसायन

सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध लिखित ’श्रीरामरसायन’ हा ग्रंथ सकल एवं प्रासादिक रामायण आहे.

हा ग्रंथ हा प्रभू श्रीरामचंद्राचे निव्वळ जीवनचरित्रच नसून त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या विविध व्यक्तिमत्वांचेही विविध पैलू दाखवितो, ज्यायोगे माझी भूमिका जीवनात काय असावी हे स्पष्ट करतो.


सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापूंनी ‘रामायणा’ सारख्या महान पवित्र ग्रंथातील सार आणि सत्व श्रद्धावानांकरिता सहज, सुंदर व मोजक्या शब्दांमध्ये, सचित्र अशा या ग्रंथाच्या स्वरूपात खुले करून दिले आहे. 

हा ग्रंथ मानवाच्या जीवनातील दुष्प्रारब्धरूपी अहंकारी रावणाचा नाश करण्यासाठी, तसेच रामाच्या भक्तिभाव चैतन्यात राहून त्याद्वारे आपल्या जीवनात उचित बदल घडवून आणण्यासाठी एक सहजसोपा आध्यात्मिक मार्ग दाखवितो.